Type Here to Get Search Results !

तुळस ग्रामपंचायतच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल यादीतील भ्रष्टाचाराची चौकशी करा... संतोष राऊळ



तुळस ग्रामपंचायतच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल यादीतील भ्रष्टाचाराची चौकशी करा... संतोष राऊळ

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील तुळस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मंजूर घरकुलांच्या यादीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका सरचिटणीस संतोष राऊळ यांनी केला आहे
याबाबत वेंगुर्ले गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे यामध्ये प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन-2015-2016 ते 2024-2025 पर्यंत घरकुल मंजुर करणेत आलेली आहे. सदर घरांचा सर्वे करताना कोणालाही विश्वासात न घेता परस्पर सर्वे करणेत आलेला आहे. त्यामुळे तुळस ग्रामपंचायत क्षेत्रातील मंजुर घरकुलांच्या यादीमध्ये मोठा भ्रष्ठाचार झाल्याचा माझा आरोप आहे. घरकुलांचा सर्वे करताना कोणालाही विश्वासात न घेता सर्वे करण्यात आला. ज्यांना घरकुलांची आवश्यकता नसताना घरकुले मंजुर झाली आणि ज्यांना आवश्यक आहे त्यांना घरकुल मंजुर झालेली नाहीत तसेच एकाच घरात आई व मुलगा किंवा वडील व मुलगा यांना दोन घरे मंजुर झाली असताना एकच घर बांधले गेले व दोन घरांचे अनुदान उकळले गेले असल्याची माझी तक्रार आहे. घरकुलांचा प्रस्ताव ग्रामपंचायत कडुन सादर करताना 7/12 पाहीला जात नाही सात बारा जोडला जातो एक आणि घरकुल बांधले जाते दुसरीकडे तसेच आपल्या मर्जीतील लोकांचा प्रस्ताव तयार केला जातो याबाबत आपण सदच्या तक्रारीची चौकशी करुन आम्हाला न्याय मीळुन दयावा असे गटविकास अधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.





Post a Comment

0 Comments