Type Here to Get Search Results !

आमदार श्री. निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह हूमरमळा श्री देव रामेश्वराचे घेतले दर्शन... मंदीरासाठी एक लाख रुपये देणगी स्वरुपात कमिटीला प्रदान


आमदार श्री. निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह हूमरमळा श्री देव रामेश्वराचे घेतले दर्शन... मंदीरासाठी एक लाख रुपये देणगी स्वरुपात कमिटीला प्रदान

   मनोज देसाई 
नवप्रभात NEWS 

हुमरमळा येथील सुप्रसिध्द श्री देव रामेश्वर मंदिराच्या शिवरात्र उत्सवाला आमदार श्री. निलेश राणे यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह श्री देव रामेश्वराचे दर्शन घेतले. आमदार निलेश राणे यांनी एक लक्ष रुपये देणगी स्वरुपात कमिटीला प्रदान केले.
     देवस्थान समिती तर्फे श्री.पंकज देसाई , शेखर परब,स्नेहल सामंत,योगेश गाळवणकर आदींनी त्यांचे स्वागत केले. तसेच माजी उद्योजक श्री.त्रिंबक देसाई यांच्या कडे, आमदार राणे यांनी देणगी सुपुर्त केली.
राणे यांच्या बरोबर भारतीय जनता पक्षाचे कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, कुडाळ माजी नगराध्यक्ष विनायक राणे , शिवसेना कुडाळ तालुकाचे करलकर , जिल्हा सरकारी वकील अँड. रुपेश देसाई, हुमरमळा ग्राम पंचायत सदस्य विरेंद्र सावंत, बारीश उपाध्ये, तसेच मंदार गाळवणकर, अनंत तावडे, रवींद्र सावंत, महेश परब, संजय परब, स्वानंद उपाध्ये, महेश कानडे आदी उपस्थित होते.
हुमरमळा देवस्थान तसेच इतर विषयी आपण आमदार म्हणून यापुढेही नेहमीच , सकारात्मक प्रतिसाद देऊ अशी ग्वाही आमदार यांनी यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments