Type Here to Get Search Results !

घरकुल योजना लाभार्थ्यांना आदेश व प्रथम हप्ता वितरण उद्या


घरकुल योजना लाभार्थ्यांना आदेश व प्रथम हप्ता वितरण उद्या

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 


   प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मंजूर घरकुलांचे आदेश वितरण व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम शनिवार दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पंचायत समिती सभागृहात होणार आहे, अशी माहिती वेंगुर्ले पंचायत समिती गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत वेंगुर्ले तालुक्यात ८३६ घरकुले मंजूर झाली आहेत. यापैकी सुमारे ३०० लाभार्थ्यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी स्वतंत्ररित्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.यावेळी माजी तालुका स्तरीय पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तद्नंतर लगेचच लाभार्थी यांचे प्रशिक्षण व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. सायंकाळी ४.४५ वाजता राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार असून केंद्रिय गृहमंत्री अमित शाह मार्गदर्शन करणार आहेत. या प्रक्षेपणानंतर तालुकास्तरीय लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र वाटप व सर्व पात्र लाभार्थ्यांच्या अकाउंटला पंधरा हजार रूपयांचा पहिला हप्ता एका क्लिकवर जमा करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments