सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधकचे माणिक भानुदास सांगळे व उर्मिला महादेव यादव यांना 33 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले
नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग
गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणी कामी यातील तक्रारदार यांचे स्वामी समर्थ गृहनिर्माण संस्था मर्यादीत, रेवतळे, मालवण, जि. सिंधुदुर्ग या गृहनिर्माण संस्थेच्या मानीव अभिहस्तांतरण आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करुन जमीन संस्थेच्या नावे करणेकरिता रुपये ५० हजार रकमेच्या लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी प्राप्त झाली होती. दि. १६ जानेवारी २०२५ रोजी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेविका श्रीमती उर्मिला यादव यांनी तक्रारदार यांच्याकडे रुपये ४० हजार लाचेची रक्कम मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार दि. ४ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या दुसऱ्या पडताळणी कारवाई दरम्यान दोन्ही आरोपी लोकसेवक माणिक सांगळे यांनी तक्रारदार यांचेकडे रुपये ३३ हजार लाच मागणी केली तसेच आरोपी लोकसेविका उर्मिला यादव या तक्रारदार यांच्याकडे लाचमागणी करीत असताना आरोपी लोकसेवक माणिक सांगळे यांनी तेथे हजर राहून लाच मागणीस प्रोत्साहन दिले.
दि. ४ फेब्रुवारी रोजी आरोपी लोकसेविका २ यांनी तक्रारदार यांचेकडून मागणी केलेली लाचेची रक्कम रुपये ३३ हजार पंच साक्षीदार यांचे समक्ष तक्रारदार यांचेकडून स्वीकारताना रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
दोन्ही आरोपी लोकसेवक यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली.
यावेळी मनोज जिरगे, पोलीस निरीक्षक पो.ह.क्र. ८८, जनार्दन रेवंडकर, पो.ह.क्र. २३, रविकांत पालकर, पो.ह.क्र. १०९९, प्रथमेश पोतनीस, पो. हवा विशाल नलावडे, पो.ह.क्र. ३५, संजय वाघाटे म.पो.शि.क्र. १५७९/समिता क्षिरसागर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांचा समावेश होता.
पर्यवेक्षण अधिकारी अरुण पवार, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. संजय गोवीलकर, अपर पोलीस अधीक्षक, प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. मा. सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.
Post a Comment
0 Comments