वेंगुर्ला भाजपच्या वतीने पत्रकार भरत सातोस्कर,महेंद्र मातोंडकर यांचा सत्कार
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा आदर्श पत्रकार पुरस्कार पत्रकार भरत सातोस्कर यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचा व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार महेंद्र मातोंडकर यांचा वेंगुर्ला भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात भाजपा तर्फे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर यांनी हा सत्कार केला. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मॅक्सि कार्डोज, सचिव विनायक वारंग, माजी जिल्हा उपाध्यक्ष दाजी नाईक, माजी जिल्हा कार्यकारणी माजी सदस्य दिपेश परब, माजी तालुकाध्यक्ष प्रदीप सावंत, प्रथमेश गुरव, एस एस धुरी , दिलीप परब , सुनिल मठकर उपस्थित होते
Post a Comment
0 Comments