ज्येष्ठ पत्रकार भरत सातोसकर यांचा वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार.
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेंगुर्ले येथील दैनिक तरुण भारत संवाद चे ज्येष्ठ पत्रकार भरत सातोसकर यांना नुकताच जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त त्यांचा आज वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व महिला काथ्या औद्योगिक संस्था यांच्या वतीने शाल , श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी महिला काथ्या संस्थेच्या वतीने नूतन वर्षाचे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव एम. के. गावडे , राष्ट्रवादी काँग्रेस
महिला जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा परब ,महिला काथ्या औद्योगिक संस्थेच्या चेअरमन माधवी गावडे, सावित्रीबाई संस्थेच्या चेअरमन प्रविणा खानोलकर , वेंगुर्ले शाळा नंबर १ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान साटेलकर ,राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष ऋतुजा शेटकर ,महिला
शहराध्यक्ष सुचिता परब , वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीचे उपाध्यक्ष महेंद्र मातोंडकर ,माजी जिल्हा उपाध्यक्ष दाजी नाईक, सल्लागार प्रदीप सावंत, सचिव विनायक वारंग, प्रथमेश गुरव, सावळाराम भराडकर ,तसेच रंजना कदम ,प्रिया धुरी ,अंजली धुरी ,साधना शिरोडकर, अशोक धुरी, प्रियाका कोयंडे ,रूपा खानोलकर, सुप्रिया जाधव आदींसह महिला नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments