संविधानाने प्रत्येकाला व्यापार व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे मात्र आपल्याला जागृत राहिलं पाहिजे... पालकमंत्री नितेश राणे
नवप्रभात NEWS/ वैभववाडी
वैभववाडी तालुका व्यापारी संघ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात पालकमंत्री नितेश राणे उद्घाटक म्हणून बोलत होते यावेळी ते म्हणाले, जिल्ह्याच्या व्यापाऱ्याची संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मला मिळालेली आहे. आपल्याला कुठल्याही समस्या निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. चांगल्या सेवा सुविधा दिल्या जातील. कोणत्याही जिल्ह्याची बाजारपेठा या त्या जिल्ह्याच्या विकासासाठी, आर्थिक उन्नती होण्यासाठी गरजेची आहे. पोलीस यंत्रणेनेसोबत बैठकीत मी व्यापारी, नागरिक यांना त्रास देवू नये. सुरक्षित व्यापार करता यावा यासाठी सूचना दिल्या आहेत. यापूर्वी पासून मी आमदार असल्यापासून व्यापारी आणि नागरिकांच्या काय अडचणी आहेत हे माहित आहे. सरकारच्या संपूर्ण यंत्रणा आपल्या साठी आहेत.
जिल्ह्याचे व्यापार धोरण ठरविण्याची गरज आहे. अधिकृत दुकाने राहिली पाहिजेत. ती वाढली पाहिजेत. अनधिकृत व्यापाराला अंकुश येण्यासाठी आपण जागृत असेल पाहिजे. सर्वजण एकत्र मिळून काम केले पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टीने तडजोड होता नये. असे सांगताना कणकवलीत 16 लोक थेट युपी मधून येवून व्यापार करतात. नोयेडा मधील माणूस आपल्या बाजारात बॅग विकत होता. संविधानाने प्रत्येकाला व्यापार व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे मात्र आपल्याला जागृत राहिलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टीने या सर्व गोष्टींचा विचार व्यापारी संघानेही केला पाहिजे अश्या अपेक्षा यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केल्या.
Post a Comment
0 Comments