Type Here to Get Search Results !

जयपूर, राजस्थान मध्ये गुन्हा करुन वेंगुर्ला शिरोडा येथे येथे लपलेल्या आरोपींना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली अटक


जयपूर, राजस्थान मध्ये गुन्हा करुन वेंगुर्ला शिरोडा येथे येथे लपलेल्या आरोपींना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली अटक

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

दि. २४/०१/२०२५ रोजी सायंकाळी ०७.३० वा. ते ०१.०० वा. चे मुदतीत रमणपूरी, बर्णद रोड, करधनी, नि, जयपूर, राज्य राजस्थान येथे शिवराज गैंग, राजस्थानचे आरोपी हन्नी बिहारी आणि त्याच्या ०३ सायौदारांनी खंडणीसाठी स्विफ्ट कारमधून येवून फिर्यादी व साक्षीदार यांचा पिस्टलने गोळ्या झाडून खून करण्याचा प्रयत्न करुन पळून गेले. त्यापैकी आरोपी (१) करन मातादिन पारीक, वय २२ वर्षे, रा. मोरीना, पोलीस ठाणे आरमाडा, प्लॉट नं. १, रमणबिहार सोसायटी, मुरलीपूरा, ता. चौमू, नि. जयपूर, राज्य राजस्थान (२) दिपक सोमबीर जाट ऊर्फ लांबा, वय २० वर्षे, रा. सरदारपूरा, पोलीस ठाणे आरमाडा, ता. अमेर, जि. जयपूर, राजस्थान (३) नरेंद्रसिंग गजेंद्र चौहान, वय १९ वर्षे, रा. बेनार रोड, खोराबौसल, रामनगर ६ कॉलनी, प्लीट नं. १ ता. अमेर, जि. जयपूर, राजस्थान यांनी गुन्हा केल्यानंतर अस्तित्व लपविण्यासाठी दि. २८/०१/२०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वा. पासून शिरोडा येथे वास्तव्य केल्याचे समोर आले आहे. सदर आरोपीविरुद्ध करधनी पोलीस ठाणे, जि. जयपूर (पश्चिम), राज्य राजस्थान येथे गुन्हा रजि. क्र. १०/२०२५, भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १०९ (१), १८९ (४), ३०८ (२), भारतीय हत्यार अधिनिमय १९५९ (संशोधन २०१९) चे कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, करधनी पोलीस ठाणे, जयपूर यांचेकडील प्राप्त माहितीनुसार सदर आरोपी हे शिरोडा, सिंधुदुर्ग व गोवा राज्यात असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस दिलेली होती. त्यानुसार विशेष पथके तयार करुन आरोपींचा सतत शोध घेण्यात येत होता. त्याचदरम्यान सदर आरोपी हे शिरोडा एस. टी. बस स्टैंड जवळील एका राजस्थानी बेकरी व्यवसायिकाच्या बेकरी जवळ राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याबरुन सापळा रचून तिन्ही आरोपींना शिरोडा येवून ताब्यात घेण्यात आले. यातील आरोपी करन मातादिन पारीक याच्याविरुद्ध जयपूर जिल्हयात दोन गंभीर गुन्हे दाखल असून त्यामध्ये लहान मुलीबर अत्याचार, अंमली पदार्थ विक्री अशा गुन्हयाचा सहभाग आहे. सदर आरोपी यापूबी दोन वेळा सुमारे ३ महिन्यापेक्षा जास्त कालावधी फारागृहात राहिलेला आहे. नागरीकांना धमकावून किंवा त्यांचेवर हालना करुन खंडणी गोळा करण्याच्या उद्देशाकरीता या टोळीकडून गुन्हे केले जात आहेत. सदर आरोपींना आज दि. ३०/०१/२०२५ रोजी करधनी पोलीस ठाणे, राजस्थान पोलीसांच्या ताब्यात दिलेले आहे.
वरील प्रमाणे कारवाई मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, मा. श्री. कृषिकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्गचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पाटील, पोलीस उप निरीक्षक श्री. समीर भोसले, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक श्री. सुरेश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर, आशिष गंगावणे, बस्त्याव डिसोजा, पोलीस नाईक चंद्रकांत पालकर, अमित तेली, जयेश सरमळकर यांनी केलेली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने आवाहन करण्यात येते की, परंप्रांतीय व्यक्ती तसेच अनोळखी भाडेकरू यांना वास्तव्यासाठी ठेवताना किंवा रुम भाडयाने देताना आवश्यक ती सर्व खबरदारी घेवून त्यांचे वैयक्तिक कागदपत्रांची पडताळणी करुन तशी नोंदणी करुन घ्यावी. तसेच, परप्रांतिय तसेच अनोळखी व्यक्तींच्या संशयीत हालचाली दिसून आल्यास तात्काळ जवळचे पोलीस ठाणे, पोलीस पाटील, सरपंच, लोकप्रतिनिधी यांना तात्काळ माहिती कळवावी किंवा पोलीस विभागास डायल ११२ या हेल्पलाईनवर संपर्क करुन माहिती देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments