श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.सौ. गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
प्रशालेच्या स्वामी समर्थ सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर वेंगुर्ला पंचायत समितीच्या माजी उपसभापती तसेच शिक्षण प्रसारक समिती वेतोरेच्या अध्यक्षा सौ. स्मिता मिलिंद दामले, शिक्षण प्रसारक समितीचे कार्यवाह श्री प्रभाकर नाईक सर, पालकरवाडी ग्रामपंचायत सरपंच सदाशिव पाटील, वरचीवाडी ग्रामपंचायत सरपंच्या सौ. प्राची नाईक संचालक सुरेश धुरी, शिवराम गोगटे,रमेश गोगटे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.संजय परब आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी समर्थांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून इशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्तविक, स्वागत आणि परिचय मुख्याध्यापक श्री. संजय परब सर यांनी केले. सौ.ओवी पवार यांनी अहवालात प्रशालेच्या प्रगतीचा आलेख वाचून दाखवीला.सौ.सुजाता नाईक यांनी देणगीदारांनी दिलेल्या ठेवींची माहिती दिली.
चालू शैक्षणिक वर्षांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर नैपुण्य संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पारितोषिकांचे वाचन सौ.प्रविणा पालव यांनी केले.
सरपंच श्री. सदाशिव पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यवाह श्री नाईक सर यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवन आणि स्वागत गीताचे कौतुक करत रोख पारितोषिक दिले तसेच तालुकास्तरावर आणि जिल्हास्तरावर उज्वल यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सौ. स्मिता दामले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी वर्ष भर घेतलेल्या मेहनतीचे फळ आज मिळाल्याचे सांगितले. मिळविलेल्या यशाबद्दल सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले तसेच प्रशालेच्या इमारतीचे नुतनीकरण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख श्री.निलेश पेडणेकर सर तर आभार श्री.प्रशांत सावंत सर यांनी मानले.
Post a Comment
0 Comments