Type Here to Get Search Results !

गोव्यातील मुख्याध्यापकांच्या वेंगुर्ला अभ्यास दौऱ्यात आनंदयात्रींशी भेट व साहित्यिक गप्पा रंगल्या.

गोव्यातील मुख्याध्यापकांच्या वेंगुर्ला अभ्यास दौऱ्यात आनंदयात्रींशी भेट व साहित्यिक गप्पा रंगल्या. 

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 


       गोव्यातील पेडणे येथील तालुका लेव्हल स्कूल काॅम्पलेक्स पेडणे हेडमास्टर्स  या ग्रूपने वेंगुर्ल्यात  अभ्यास दोरा आखला होता. विविध पर्यटन स्थळे, ऐतिहासिक  स्थळे याना भेटी देण्याबरोबरच वेंगुर्ल्यातील साहित्यविश्व  समजून घेण्यासाठी आनंदयात्री वाङ्मय  मंडळाच्या वृंदा कांबळी व त्यांच्या टिमची भेट घेतली. साई दरबार डिलक्स हाॅलमध्ये झालेल्या या बैठकीत वृंदा कांबळी यांचा आजपर्यंतचा साहित्यिक  प्रवास त्यानी विविध प्रश्न  विचारून चर्चेतून समजून घेतला. वेंगुर्ला तालूक्यातील साहित्य परंपरा सांगत असताना वेंगुर्ल्यात  होऊन गेलेल्या साहित्यिकांची माहिती वृंदा कांबळी यानी उपस्थिताना सांगितली. तसेच त्यानी  आनंदयात्रींशी चर्चा केली. आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे वैशिष्ट्यपूर्ण  कार्य समजून घेतले. प्रा. सचिन परूळकर, पि. के. कुबल, महेश राऊळ, राकेश वराडकर, प्रितम ओगले, माधवी मातोंडकर  इत्यादी आनंदयात्रीचे सदस्य उपस्थित होते. आनंदयात्रीतील कार्यपद्धती व विविध उपक्रम  समजून घेतले. आनंदयात्रीतील टिम वर्क पाहून आलेले साहित्य प्रेमी शिक्षक प्रभावित झाले. 
     वृंदा कांबळी यानी आपली  कलाकृतीची निर्मितीप्रक्रिया कशाप्रकारे मनाच्या एका तरल व संवेदनशील  अस्वस्थतेतून घडत असते हे सोदाहरण सांगितले. कथाबीज भोवतालच्या जीवनातून  एखाद्याच तरल संवेदन क्षणी कशाप्रकारे वेचली जातात याचे सविस्तर कथन केले. उत्तरोत्तर रंगतदार होत जाणारी साहित्य विषयक चर्चा रसिकांसाठी संस्मरणीय ठरली. 
    वृंदा कांबळी यानी सुरूवातीला आनंदयात्रीच्यावतीने सर्वांचे स्वागत केले. प्रा. सचिन परूळकर यानी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments