Type Here to Get Search Results !

मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालय आयोजित डॉ. अरविंद दत्तात्रय खानोलकर पुरस्कृत स्व. डॉ. सौ. मालती दत्तात्रय खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा संपन्न

मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालय आयोजित डॉ. अरविंद दत्तात्रय खानोलकर पुरस्कृत स्व. डॉ. सौ. मालती दत्तात्रय खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय शालेय स्पर्धांना संपन्न 

नवप्रभात NEWS / सावंतवाडी 

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालय आयोजित डॉ. अरविंद दत्तात्रय खानोलकर पुरस्कृत स्व. डॉ. सौ. मालती दत्तात्रय खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात एस. एल. देसाई विद्यालय पाटची अनन्या ठाकुर तर लहान गटात खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदाची सानवी देसाई प्रथम क्रमांकाची विजेती ठरली.

ही स्पर्धा आठवी ते दहावी व पाचवी ते सातवी अशा दोन गटात घेण्यात आली होती.
मोठ्या गटात कार्तिकी परब (एस. एल. देसाई विद्यालय पाट) हिने द्वितीय तर तनिष्का राऊळ (मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव) हिने तृतीय क्रमांक पटकाविला. वैष्णवी वैभव सांगेलकर (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली) व शमिका नवसो मालपेकर (माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पाचवी ते सातवी गटात हर्षदा गणेश जोशी (गजानन विद्यालय पाट) ही द्वितीय क्रमांकाची मानकरी तर चिन्मय विक्रम कोटणीस (कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी) याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. कृष्णा संदेश पालव (इन्सुली नं. ४) व दुर्वा गोपाळ नार्वेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटन मा. डॉ मिलिंद खानोलकर यांच्या हस्ते स्व. डॉ. सौ. मालती दत्तात्रय खानोलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रायोजक सौ. अर्पणा खानोलकर, वाचन मंदिरचे अध्यक्ष महेश खानोलकर, कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर, स्पर्धेचे परीक्षक चंद्रकांत सावंत, शशिकांत साळगावकर, सदाशिव सावंत, संजय पंडित, ज्येष्ठ संचालक बाळकृष्ण मुळीक, बाबली नार्वेकर, माजी अध्यक्ष हेमंत खानोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. परीक्षक तसेच 'मनाचे व्यवस्थापन' या ग्रंथाचे लेखक संजय पंडित यांनी स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त मुलांना सदर ग्रंथ भेट देऊन गौरविले. मोठ्या गटासाठी असलेल्या 'सेंद्रिय शेती गरज व महत्त्व' या विषयावर बोलणाऱ्या स्पर्धकासाठी मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ज्योतीबा टपाले यांनी ठेवलेले रोख रक्कमेचे पारितोषिक रुची चंद्रशेखर कवठणकर व दिव्या चंद्रशेखर मेस्त्री यांना देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक तसेच आभार ग्रंथालयाचे कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर यांनी केले. स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास शिक्षक, पालक, मार्गदर्शक, विद्यार्थी व वाचकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments