Type Here to Get Search Results !

आईला मारहाण केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल


आईला मारहाण केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण चव्हाणवाडी येथील श्रीम. सिताबाई दादु  वय (८० म्हापण) याना त्यांचा मुलगा श्री. मनोहर दादु म्हापणकर (५२) सौ. माया मनोहर म्हापणकर (४७) श्री. गौरव मनोहर म्हापणकर (२३) श्री. प्रथमेश मनोहर म्हापणकर (२१) यांनी
मारहाण केल्याप्रकरणी या चारही आरोपींच्या विरुद्ध वेंगुर्ला न्यायालयात गुन्हा दाखल करण्याबाबत वेंगुर्ला न्यायालयाचे न्यायाधीशसाहेब डी.व्हाय्.रायरीकर यानी दि.१८/०१/२०२५ रोजी आदेशीका काढुन गुन्हा दाखल केलेला आहे. फिर्यादीच्या वतीने ॲड. मनीष सातार्डेकर व ॲड. अक्षदा राऊळ यांनी काम पाहीले.
दि. २६/०३/२०२२ रोजी सकाळी ०७.०० वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण चव्हाणवाडी येथील श्रीम. सिताबाई दादु चांभार याच्या मालकीच्या जमिन जागेमध्ये जमिनीचे काम करण्याच्या उद्देशाने त्यांचा मुलगा आरोपी श्री. मनोहर दादु म्हापणकर, सौ. माया मनोहर म्हापणकर, श्री. गौरव मनोहर म्हापणकर, श्री. प्रथमेश मनोहर म्हापणकर सर्व राहणार चव्हाणवाडी, म्हापण, ता.
वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग यांनी जे.सी.बी आणला होता त्याबाबत फिर्यादी विचारणा करण्यास गेली असता त्याचा राग आल्याने आरोपी नं. १ ते ४ यांनी फिर्यादी हिला
हाताच्या थापटाने मारहाण करुन जे.सी.बी जवळ ढकलुन दिले तसेच पुन्हा याबाबत विचारायला आलीस तर जिवे मारल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी फिर्यादी
हीला आरोपी यानी दिली होती. सबब सदर गुन्ह्याबाबत फिर्यादी हिने निवती पोलिस स्टेशन येथे दि. २६/०३/२०२२ रोजी सदर आरोपीं विरुद्ध तक्रार दिलेली होती.
परंतु पोलिसांनी आरोपी विरुद्ध कोणतीही कडक कायदेशीर कारवाई न केल्याने फिर्यादी हिने त्याबाबत व्यथीत होऊन ॲड. मनीष सातार्डेकर यांच्यामार्फत सदर गुन्हयाची फिर्याद वेंगुर्ला न्यायालयात दाखल केली होती. फिर्यादी यानी दाखल
केलेली फिर्याद त्यामधील जाबजबाब व पुरावा पाहता तसेच फिर्यादीच्या वतीने ॲड.मनीष सातार्डेकर यांनी फिर्यादीची मांडलेली बाजु ग्राह्य मानुन वेंगुर्ला न्यायालयाचे मा. न्यायाधीश डी.व्हाय्. रायरीकर यांनी या चारही आरोपींच्या विरुद्ध आदेशीका काढुन आरोपी विरुद्ध वेंगुर्ला न्यायालयात गुन्हा दाखल केलेला आहे.

Post a Comment

0 Comments