श्री क्षेत्र रेडी येथील प्रसिद्ध गणपती मंदिरात उद्या माघी गणेश जयंती विनायक चतुर्थी होणार साजरी
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील प्रसिद्ध श्री गणपती मंदिरामध्ये माघी गणेश जयंती विनायक चतुर्थी विविध कार्यक्रमांनी दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी होणार आहे
या दिवशी सकाळी ०६.०० वा. गणेश मुर्तीवर अभिषेक करून कार्यक्रमास प्रारंभ होईल त्यानंतर सकाळी ०८.३० वा. सत्यविनायक महापूजा दुपारी १२.३० वा. आरती व तीर्थप्रसाद दुपारी ०१.०० वा. महाप्रसाद संध्याकाळी : ५ ते ७ वाजेपर्यंत स्थानिक भजने होतील
श्री अजय सिंग देसाई आणि मित्रपरिवार कोल्हापूर यांनी उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे
अधिक माहितीसाठी संपर्क कृष्णाजी श्रीनिवास कामत ८८०६६०५६६९ विनायक सदानंद कांबळी ९४२३१६६५४५ संदेश सदानंद कांबळी ९४२२९७६७७६ यांच्याशी संपर्क साधावा व सर्व कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव गजानन देवस्थान ट्रस्ट रेडी यांनी केले आहे
Post a Comment
0 Comments