जिल्हास्तरीय,' मिस आंदुर्ले स्पर्धेत' कु.पुजा सावंत विजेती
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
वेगवेगळ्या प्रश्नांच्या फैरीत, डिजेच्या तालावर, रॅम्पवॉक करीत, निवेदकाच्या सुचनांचे पालन करीत, आंदुर्ले येथील 'मिस आंदुर्ले २५' स्पर्धेत सावंतवाडीच्या युवतींनी बाजी मारत,स्पर्धेवर वर्चस्व प्रस्थापित केले.
सावंतवाडीची कु.पुजा सावंत हिने प्रथम,तर भार्गवी पांगम व नंदिनी बिले यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
तर, बेस्ट परस्नॅलिटी किताब,कु.प्रदिप्ती कोटकर,
बेस्ट स्माईल किताब कु.दुर्वा सावंत, आणि बेस्ट रॅम्पवॉक किताब कु.स्नेहल जांबोरे व पुजा म्हाडदळकर या युवतींना विभागुन देण्यात आला.
काहीशी उशिरा सुरू झालेली ही स्पर्धा ,मात्र ऊतरोत्तर रंगत गेली. व आंदुर्लेचे प्रेक्षक रात्री उशिरा पर्यंत जागचे हलले नाहीत.
तिन फे-यात ही स्पर्धा घेण्यात आली.
परीक्षकांच्या सहज प्रश्नांवर काहींची भंबेरी उडाली तर, काहींनी चपखल उत्तरे दिली.
साई जळवी फील्म एन्टरटेन्मेंट व आंदुर्लेचे आंदुर्लाई देवी ग्रामोक्रषक मंडळातर्फे याचे आयोजन करण्यात आले होते.
मा. पंचायत समिती सभापती संजय वेंगुर्लेकर यांनीही या उत्सवासाठी बरीच मेहनत घेतली आहे.
स्पर्धेला शरावती शेट्टी, साई जळवी, आदींनी परिक्षण केले. तर कु. रूचिता शिर्के आणि पाट येथील अमर प्रभु यांनी सुंदर निवेदन सादर केले.
रात्री उशिरा बक्षीस वितरण समारंभ संजय वेंगुर्लेकर, माजी सरपंच सौ.आरती पाटील, सरपंच अक्षय तेंडुलकर, उपसरपंच गोविंद मोर्ये , नाट्य कलावंत तेजस पिंगुळकर, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
आभार अमर प्रभु यांनी मानले.
Post a Comment
0 Comments