नगरपरिषद सभागृह येथे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मार्गदर्शन मेळाव्यात उपस्थित मुख्याधिकारी परितोष कंकाळ. सोबत प्रतीक डोंगरदिवे, उपस्थित शहरातील लाभार्थी.
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले शहर गेल्या दोन वर्षात घरकुल योजना च्या बाबतीत पूर्ण कोकणात आघाडीवर असून नागरिकांनी शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा व आपली उन्नती साधावी, असे प्रतिपादन वेंगुर्ले मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी येथे आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना केले. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना शहरी (२.०) बद्दलची सविस्तर माहिती लाभार्थ्यांना दिली व सविस्तर मार्गदर्शन केले.
वेंगुर्ले नगरपरिषद मार्फत प्रधानमंत्री आवास योजना शहरी (2.0) अंतर्गत माहिती व मार्गदर्शन मेळावा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे संपन्न झाला. वेंगुर्ले मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या अध्यक्षतेखाली व शहरस्तरीय तांत्रिक अभियंता प्रतीक डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा संपन्न झाला. यावेळी परितोष कंकाळ व प्रतीक डोंगरदिवे यांनी उपस्थित लाभार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रधानमंत्री आवास योजना शहरी (2.0) च्या अनुषंगाने लाभार्थी पात्रता, त्यांना अर्ज मंजुरीसाठी लागणारे कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज करण्यासंदर्भात मार्गदर्शन, अनुदान लाभ मिळण्याच्या पद्धती , नागरिकांचे इतर प्रश्न याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मागील दोन वर्षात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत शहरातील 35 लाभार्थ्यांना घरकुले देण्यात आली आहेत. रमाई आवास योजना अंतर्गत 23 घरकुले पूर्ण झाली आहेत. तर आदिवासी लोकांसाठी शबरी आवास योजना अंतर्गत 25 लाभार्थ्यांचे अर्ज मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती प्रतीक डोंगरदिवे यांनी यावेळी दिली. शहरातील 120 लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट असून, याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. या मार्गदर्शन मिळाव्यास नवीन 55 लाभार्थी उपस्थित होते.
फोटो : नगरपरिषद सभागृह येथे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मार्गदर्शन मेळाव्यात उपस्थित मुख्याधिकारी परितोष कंकाळ. सोबत प्रतीक डोंगरदिवे, उपस्थित शहरातील लाभार्थी.
Post a Comment
0 Comments