Type Here to Get Search Results !

वेंगुर्ल्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा

वेंगुर्ल्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा

नवप्रभात NEWS/ वेंगुर्ले 

 वेंगुर्ला-वायंगणी येथील दोन विद्यार्थ्यांना रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवजाचे मिळालेले पाकीट खर्डेकर महाविद्यालयातील विद्याधर्थी साई कामत आणि वरूण दाभोलकर यांनी प्रामाणिकपणा दाखवून मूळ मालकाला परत केले.

वेंगुर्ले शहरातील दत्त मंदिर शेजारील मार्गाने जात असताना खर्डेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी साई कामत आणि वरुण दाभोलकर यांना तेथे पाकीट निदर्शनास आले त्यांनी ते पापीट उचलून पाहिले असता त्यामध्ये रक्कम असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पाकीट मालकाचा शोध घेत वेंगुर्ले कुबलवाडा येथील सूरज साळगांवकर यांनी आपली ओळख पटवून दिल्यावर ती रोख रक्कम व त्यांचे पाकीट वायंगणी येथील साई कामत आणि वरुण दाभोलकर या विद्याथ्यांनी सुरज साळगावकर यांच्याकडे सुपूर्त केले.

सदर दोन्ही विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाचे पाकीट मालक सुरज जळगांवकर यांनी कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments