Type Here to Get Search Results !

माझी वसुंधरा अभियान ५.० व स्वच्‍छ सर्व्‍हेक्षण २०२५ अंतर्गत वेंगुर्ला नगर‍परिषदेमार्फत महिला बचत गटांसाठी पर्यावरण संवर्धनाबाबत विविध कार्यशाळा संपन्‍न


माझी वसुंधरा अभियान ५.० व स्वच्‍छ सर्व्‍हेक्षण २०२५ अंतर्गत वेंगुर्ला नगर‍परिषदेमार्फत महिला बचत गटांसाठी पर्यावरण संवर्धनाबाबत विविध कार्यशाळा संपन्‍न

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

 वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्‍वामी विवेकानंद सभागृहात बांबू, शेवगा वाळा तसेच घरगुती रोपवाटीकेसाठी कलम तंत्र व पर्यावरणपूरक बीजगोळे तयार करणे याबाबतच्या कार्यशाळा संपन्‍न झाल्या. याप्रसंगी मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ, प्रशासकीय अधिकारी श्रीम. संगीता कुबल, सहा. कार्यालय अधिक्षक श्री. वैभव म्हाकवेकर, शहर समन्‍वयक कु. पूर्वा मसुरकर, स्‍वयंप्रभा फाऊंडेशनचे श्री.अतुल राऊत पत्रकार महेंद्र मातोंडकर, अजय गडेकर व इतर पदाधिकारी तसेच महिला बचत गटांच्या बहुसंख्‍य महिला उपस्थित होत्या. 
 पर्यावरणाचा ढासळणारा समतोल पाहता हवामान बदल आणि त्‍याचा आपल्‍या दैनंद‍िन राहणीमानावर तीव्र परिणाम होत आहे. परसबागेत पोषणयुक्‍त भाजीपाला व फळझाडे दैनंदिन आहारात पोषणासोबतच पर्यावरण संवर्धन देखील करु शकतात. कमी कालावधीमध्‍ये झाडाची मोठया प्रमाणावर लागवड करण्‍यासाठी ‘बीजगोळयांसारख्या’ नवकल्‍पनांची आवश्‍यकता आहे. 
 ‘बांबू, शेवगा व वाळा’ याबाबतच्‍या माहिती सत्रामध्‍ये जैव विविधता संवर्धन, पोषण व आरोग्‍याच्या दृष्‍टीने बांबू, शेवगा व वाळयाचे महत्‍व उपस्थितांना समजावून सांगण्‍यात आले. केंद्रसरकार मार्फत जाहीर करण्‍यात आलेल्‍या मिशन बांबू योजनेअंतर्गत बांबू शेतीमधून आर्थिक उत्‍पनाची माहिती देण्‍यात आली. महिला बचत गटांच्‍या सदस्‍यांनी प्रश्‍नमंजूषेद्वारे विषय समजून घेतला. बांबू व शेवगा लागवडीस प्रोत्‍साहन देण्‍यासाठी सहभागी महिलांना बांबूची रोपांचे वाटप करण्‍यात आले.
 ‘घरगुती रोपवाटीकेसाठी कलम तंत्र’ या माहिती सत्रात परसबागेमधील (Kitchen Garden) कलमतंत्राच्या सहाय्याने गुलाबासारख्या फुलझाडे व फळ झाडांच्‍या फादयांचे कलम बनविण्‍याचे प्रात्‍यक्षिक करुन दाखविण्‍यात आले. जैवि‍विवधता संवर्धनातून विविध फळझाडे व फुलझाडांची घरच्‍या घरी रोपवाटीका कशी बनवावी याबाबत प्रात्‍यक्षिकातून मार्गदर्शन करण्‍यात आले. यावेळी सहभागी महिलांना त्‍यांच्‍या आर्थिक वाढीसाठी विविध १५ प्रकाराच्‍या भाजीपाला बियाण्यांचे वाटप करण्‍यात आले. 
 हवामान बदलाची तीव्रता व निसर्गाच्या ढासळणा-या समतोलावर मात करण्‍यासाठी वृक्ष महत्‍वाची भूमिका बजावतात. जगभरात नियमितपणे ठिकठिकाणी वृक्ष लागवड करण्‍यात येत आहे. वृक्ष लागवड करण्‍यासोबतच पृथ्वीवरील हरीत क्षेत्र वाढविण्‍यासाठी बीजगोळयांची नाविन्यपूर्ण संकल्‍पना राबविण्‍यात येत आहे. यासअनुसरुन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत ‘पर्यावरणपूरक बीजगोळयांच्या निर्मितीची’ कार्यशाळा पार पाडली. यावेळी सहभागी महिलांनी शहरातून संकलित करण्‍यात आलेल्‍या साधारण २० किलो पेपर रद्दीपासून १००० पेक्षा जास्‍त बीजगोळे तयार केले. या बीजगोळ्यामध्‍ये विविध देशी प्रजातींच्‍या बियांचे रोपण करुन पावसाळी हंगामात त्‍याची लागवड करण्‍यात येणार आहे. 
"माझी वसुंधरा अभियान ५.०" अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत विविध उपक्रम राबवण्यिात येत आहेत. वेंगुर्ला शहरातील शाळा व महाविदयालयातील विदयार्थी, महिला बचत गट यांच्‍या सहभागातून पुढील कालावधीमध्‍ये अनेक पर्यावरणपूरक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्‍याचे नियोजित असून स्वच्‍छता प्रेमी वेंगुर्लावासीयांनी वसुंधरेचे जतन व संवर्धन करण्‍यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी केले.

Post a Comment

0 Comments