Type Here to Get Search Results !

जिल्हा वाचक स्पर्धेत वेंगुर्लेचे प्रसाद खडपकर प्रथमकुडाळच्या सानोली गोडे द्वितीय तर कणकवलीचे हेमंत पाटकर तृतीय

जिल्हा वाचक स्पर्धेत वेंगुर्लेचे प्रसाद खडपकर प्रथम
कुडाळच्या सानोली गोडे द्वितीय तर कणकवलीचे हेमंत पाटकर तृतीय

  मनोज देसाई 
नवप्रभात NEWS 


सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत वेंगुर्लेच्या प्रसाद विश्वनाथ खडपकर यांनी प्रथम, द्वितीय क्रमांक सौ. सानोली सचिन गोडे (कुडाळ), तृतीय हेमंत पाटकर (कणकवली), चौथा विभूती विजय ठाकुर (कुडाळ) व पाचवा योगेश मुणगेकर (मालवण) यांनी मिळविला.

कुडाळ येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहालय (जिल्हा ग्रंथालय) येथे ही स्पर्धा घेण्यात आली. यात एकूण तेरा स्पर्धकांचा सहभाग होता. या स्पर्धेपूर्वी कै. विजया वामन पाटणकर वाचनालय (कुडाळ), नगर वाचनालय (कणकवली), उमाबाई बर्वे ग्रंथालय (देवगड), नगर वाचन मंदिर (मालवण), नगर वाचनालय (वेंगुर्ले), मुक्तद्वार वाचनालय (कळणे- दोडामार्ग), श्रीराम वाचन मंदिर (सावंतवाडी) यांनी तालुकास्तरीय वाचक स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील विजेत्या तीन स्पर्धकांची या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. या स्पर्धेचे
उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष धाकू तानावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह राजन पांचाळ, सदस्य सतीश गावडे, जयेंद्र तळेकर, परीक्षक मंगेश मराठे आदी उपस्थित होते.

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. व्यासपीठावर धाकू तानावडे, राजन पांचाळ, सतीश गावडे, जयेंद्र तळेकर, मंगेश मराठे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार राजन पांचाळ यांनी मानले.

Post a Comment

0 Comments