तळगांव केंद्र शाळेचे बीट स्तरीय क्रिडा स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात घवघवीत यश..
नवप्रभात NEWS / मालवण
मालवण तालुक्यामध्ये झालेल्या कोंडये बीट स्तरीय क्रीडा स्पर्धेत केंद्र शाळा तळगांव नं 1 चे वैयक्तिक क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन करून तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेबद्दल सर्वांचे अभिनंदन होत आहे.
विजेत्या स्पर्धकांची नावे
1) कु.सकलेन शौकत मालीम याचा थाळी फेक ( लहान गट मुलगे) मध्ये प्रथम क्रमांक.
2) कु. प्रणय विनोद सावंत याचा गोळा फेक ( लहान गट मुलगे) मध्ये प्रथम क्रमांक.
3) कु.स्वराली दीपक राणे हीचा लांब उडी (मोठा गट मुली) मध्ये द्वितीय क्रमांक.
कु. आर्या परशुराम ठुकरुल हीचा धावणे ( लहान गट मुली) मध्ये प्रथम क्रमांक.
या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षक पालक वर्गासह सर्वांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment
0 Comments