Type Here to Get Search Results !

गायन आणि पठन स्पर्धेत न्यू इंग्लिश उभांदाडा विद्यालयाचे यश

गायन आणि पठन स्पर्धेत न्यू इंग्लिश उभांदाडा विद्यालयाचे यश

    योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही संपन्न झालेल्या पठण आणि गायन स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाने यश संपादन केले.
स्व.भालचंद्र शंकरराव कर्पे स्मरणार्थ सुगम संगीत स्पर्धा नुकतीच वेंगुर्ले नगर वाचनालय येथे संपन्न झाली या स्पर्धेत इयत्ता नववीच्या अमृता दत्ताराम नवार हिने व्दितीय क्रमांक पटकावला तिने विठ्ठल तु वेडा कुंभार हे भक्ती गीत सादर केले 
तर या विद्यालयातील आठवीत शिकणाऱ्या कु.
मैथिली अनंत केळूसकर हिने फुलले क्षण माझे हे भावगीत सादर करत उत्तेजनार्थ नंबर मिळवला याच ठिकाणी संपन्न झालेली स्व.पं. जनार्दनशास्त्री कशाळीकर स्मृति पाठांतर स्पर्धांमध्ये ही न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाच्या इयत्ता नववीची  कु. गायत्री पांडुरंग साधले आणि गौरंग गजानन  नेरुरकर या आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने अनुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम आणि व्दितीय क्रमांक पटकाविला 
   न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची यशाची पंरपरा कायम राखत विद्यालयाचा शिरापेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा.वैभव खानोलकर आणि लिपिक अजित केरकर यांनी विशेष मार्गदर्शन केले होते.
या  चारही विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव समारंभ  लवकरच  वेंगुर्ला नगर वाचनालयात  केला जाणार आहे.
 यशस्वी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री विरेंद्र कामत -आडारकर 
उपाध्यक्ष निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर, सचिव रांगोळीकार रमेश नरसुले ,सदस्य निलेश मांजरेकर आणि इतर सर्व संस्था पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती, पालक संघ यांनी केले असुन या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध निवेदक तसेच मुलाखतकार,उपक्रमशील अध्यापक वैभव खानोलकर यांच्या सह लिपिक अजित केरकर व या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांचे ही विशेष अभिनंदन केले आहे
 सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत यश मिळवणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाचे या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments