स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत क्षमता बांधणी कार्यशाळा व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत क्षमता बांधणी च्या अनुषंगाने राज्य अभियान संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान यांचेकडून मुख्याधिकारी, तांत्रिक कर्मचारी व सफाई कर्मचारी वर्ग या ३ स्तरावर कार्यशाळा घेण्यात येत आहेत.
दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये राज्य अभियान संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान यांचे मार्फत कुशाग्र इनोवेशन फाउंडेशन, पुणे यांनी वेंगुर्ला नगरपरिषद मधील सर्व सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक आणि मुकादम यांना प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जबाबदाऱ्या, कामाचे नियोजन, कचऱ्याचे प्रकार व त्याचे व्यवस्थापन, आवश्यक संसाधनांचा योग्य वापर, आरोग्य विम्याचे फायदे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे शासन निर्णय याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. हे सत्र केवळ माहितीपूर्णच नव्हते, तर सफाई कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे अधिक उपयुक्त ठरले. कर्मचार्यांना त्यांच्या कामातील शंका मांडण्याची व त्या शंकांचे निरसन तज्ञांकडून करून घेण्याची संधी देण्यात आली. अशा संवादात्मक उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत झाली.
तसेच या वेळी क्षमता बांधणी कार्यशाळेमध्ये सक्रीय सहभाग घेणाऱ्या तीन उत्कृष्ट स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या अपार मेहनतीचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी नगर विकास विभाग, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांचे मार्फत "मार्गदर्शक पुस्तिका " देखील सदर कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत क्षमता बांधणी च्या अनुषंगाने राज्य अभियान संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान यांचेकडून आयोजित करण्यात आलेल्या क्षमता बांधणी कार्यशाळा उपक्रमाबाबत मा. मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी राज्य अभियान संचालनालय व कुशाग्र इनोवेशन फाउंडेशन, पुणे यांचे आभार मानले. या कार्यशाळेमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी कामाचे स्वरूप, वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचा (PPE) वापर, कचऱ्याचे वर्गीकरण, आणि आरोग्याचे महत्व याबाबत तपशीलवार माहिती दिल्याने त्यांच्या दैनंदिन कामकाजा मध्ये चांगला बदल होणार असून ही सर्व माहिती त्यांना नियमित कामकाजात अतिशय उपयुक्त ठरणारी आहे असे मत मा. मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी व्यक्त केल.
Post a Comment
0 Comments