माडबागायतीमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करून नुकसान करत पोलिसांचा धाक दाखवून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा....
नवप्रभात NEWS / ओरोस
आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणाऱ्या आमच्या माडबागायतीमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करून नुकसान करत पोलिसांचा धाक दाखवून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वेंगुर्ले कोंडूरा येथील अन्यायग्रस्त महिलांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या जवळ लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले - वायंगणी कोंडुरा येथील गाव मौजे तळेकरवाडी येथील सर्वे नंबर 89/3 व 87/1 या जमीन मिळकती आमच्या सामाजिक असून त्यामध्ये आमची पूर्वंपारिक माडबायती आहे मच्छीमारी मोल मजुरी व या माडबागायतीवरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आला आहे.परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून आमच्या सामायिक असलेल्या कुळपणाच्या जमीन मिळकतीमध्ये रस्त्याच्या नावाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांच्या बांधकाम विभागाचे अधिकारी - कर्मचारी बेकायदेशीर रित्या आमच्या माड बागायतीच्या मिळकतीमध्ये रस्ता करण्याच्या नावाखाली बेकायदेशीर अतिक्रमण करून आमच्या माड बागायतीचे नुकसान करत आहेत .
आमच्या सामायिक व कुळपणाच्या जमीन मिळकती शासनाने कुठल्याही कायदेशीर बाबींची पूर्तता करून अद्याप पर्यंत संपादित केलेल्या नाहीत व यापूर्वी देखील आम्ही किंवा आमच्या कुटुंबाकडून कुठल्याही कायदेशीर शासकीय दस्ताने त्या मिळकती आम्ही कुणालाही दिलेल्या नाही व देणार ही नाही असे वारंवार सांगून देखील संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी आमच्याच मिळकतीमध्ये येऊन आम्हाला धमकी देण्याचे प्रकार करत आहेत.
याबाबत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग या ठिकाणी उपोषण देखील छेडले होते परंतु यावेळी देखील आम्हाला न्याय देण्यात आलेला नाही.
त्यामुळे आमच्या उपजीविकेचे साधन असलेल्या माड बागायतीमध्ये आम्ही वावर करत असताना या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांपासून आमच्यासह आमच्या कुटुंबाला धोका निर्माण झालेला आहे.
त्यामुळे आमच्या मिळकतीमध्ये संबंधित बांधकाम विभागाकडून पोलीस बळाचा वापर करून बेकायदेशीर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्या ठिकाणी होणाऱ्या परिणामास महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना सर्वस्वी जबाबदार धरण्यात यावे व आमच्या या विनंती अर्जाचा विचार करून आमच्या उपजीविकेचे साधन असलेल्या माड बागायती वाचविण्याच्या दृष्टीने आम्हाला योग्य तो न्याय देण्यात यावा अशी मागणी कोंडुरा येथील अन्यायग्रस्त महिला प्रणाली पेडणेकर व नीता पेडणेकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे जवळ लेखी निवेदन सादर करून केली आहे
Post a Comment
0 Comments