Type Here to Get Search Results !

न्यू इंग्लिश स्कूल च्या वैभवी, प्रणालीसह ईशाचे वक्तृत्व स्पर्धत यश


न्यू इंग्लिश स्कूल च्या वैभवी, प्रणालीसह ईशाचे वक्तृत्व स्पर्धत यश

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 


सुदत्त कल्याणनिधी पुरस्कृत वक्तृत्व स्पर्धा नुकतीच वेंगुर्ले नगर वाचनालय येथे संपन्न झाली इयत्ता आठवी ते बारावी गटातील या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची इयत्ता आठवीची विद्यार्थ्यांनी कु. ईशा सुधर्मा गिरप हिने 
 तृतीय क्रमांक पटकावला स्वामी विवेकानंदांची शिकवण या विषयावर तिने सादरीकरण केले 
तर याच ठिकाणी संपन्न झालेली वक्तृत्व स्पर्धेत 
देशप्रेमी स्वातंत्र्यवीर सावरकर विषयावर व्यक्त होताना न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाच्या कु. वैभवी सुदेश चिपकर हिने प्रथम क्रमांक पटकावला तर याच विद्यालयाची कु.प्रणाली अनंत गवंडे हिने व्दितीय क्रमांक पटकावला.
   न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची यशाची पंरपरा कायम राखत विद्यालयाचा शिरापेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या यशस्वी विद्यार्थिनींना या प्रशालेचे उपक्रमशिल अध्यापक प्रा.वैभव खानोलकर आणि लिपिक अजित केरकर यांनी विशेष मार्गदर्शन केले होते.
या विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव समारंभ लवकरच वेंगुर्ला नगर वाचनालयात केला जाणार आहे.
 यशस्वी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री विरेंद्र कामत -आडारकर 
उपाध्यक्ष निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर, सचिव रांगोळीकार रमेश नरसुले ,सदस्य निलेश मांजरेकर आणि इतर सर्व संस्था पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती, पालक संघ यांनी केले असुन या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध निवेदक तसेच मुलाखतकार,उपक्रमशील अध्यापक वैभव खानोलकर यांच्या सह लिपिक अजित केरकर व या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांचे ही विशेष अभिनंदन केले आहे
 सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत यश मिळवणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाचे या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments