Type Here to Get Search Results !

माझी वसुंधरा अभियान 5.0 प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय तांत्रिक तज्ञ श्री.मंदार पाटील यांची वेंगुर्ला नगरपरिषदेस भेट

माझी वसुंधरा अभियान 5.0 प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय तांत्रिक तज्ञ श्री.मंदार पाटील यांची वेंगुर्ला नगरपरिषदेस भेट

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फंत माझी वसुंधरा अभियान 5,0 अंतर्गत शहरामध्‍ये विविध उपक्रम राबविण्‍यात येत आहेत. अग्नि, जल, वायु, भूमी व आकाश या पंचतत्‍वांचे जतन व संवर्धन करण्‍याच्‍या अनुषंगाने शासनाच्‍या आदेशानुसार कोकण विभागामध्‍ये वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फंत नियमीतपणे चांगले काम केले जात आहे. याच अनुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेस प्रगत गुणानुक्रम मिळविण्‍यासाठी विविध कामांचा आढावा घेण्‍यासाठी प्रादेशिक उपसंचालक कार्यालय यांचेकडुन विभागीय तांत्रिक तज्ञ श्री.मंदार पाटील यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेस भेट दिली. या दरम्‍यान त्‍यांनी माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फंत चालु असलेल्‍या कामांची पाहणी केली. तसेच याबाबत प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments