पुणे येथे झालेल्या द रॉयल पेजेंट मिस महाराष्ट्र 2024 स्पर्धेत शिरोडा वेळागर येथील मालिनी मदन अमरे ठरली प्रथम क्रमांकाची मानकरी
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागरवाडी येथील मालिनी मदन अमरे हिने पुणे – आळंदी येथे संपन्न झालेल्या द रॉयल पेजेंट मिस महाराष्ट्र 2024 स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत विजेत्याच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
सदर स्पर्धा सई तापकीर, द रॉयल पेजेंट प्रोडक्शन, पुणे यांनी आयोजित केली होती. या स्पर्धेत फायनल राऊंडमध्ये दमदार प्रदर्शन करत मालिनी अमरे यांनी प्रथम क्रमांक मिळत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा डंका बजावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याआदी देखील मालिनी मदन अमरे हीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश संपादन केलेले आहे
Post a Comment
0 Comments