Type Here to Get Search Results !

पाट हायस्कूल येथे रानभाजी पाककला स्पर्धा, प्रदर्शन विक्री आणि पारितोषिक वितरण

पाट हायस्कूल येथे रानभाजी पाककला स्पर्धा, प्रदर्शन  विक्री आणि पारितोषिक वितरण

   मनोज देसाई
नवप्रभात NEWS 

     शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पाट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाट येथे रानभाजी पाककला स्पर्धा, प्रदर्शन व विक्री हा उपक्रम प्रशालेतील इकोक्लब राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला.
      पावसाळ्यात कोकणात विविध प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळतात. अगदी माळरानावर, शेताच्या कडेने, घराच्या बाजूला  विविध रानभाज्या नैसर्गिक रित्या  उगवतात व सहज उपलब्ध होतात. यात अळू,पेवगा, टाकळा, फोडशी,घोटवेल, एक पानाची भाजी, शेवगा,करटोली,कुर्डू, कुड्याच्या  शेंगा, सुरण , चवयीची केळफुले, मावशीची भाजी अशा विविध प्रकारच्या भाज्या आपल्या परिसरात सापडतात.
        परंतु अलीकडच्या फास्टफूडच्या जमान्यात आजची पिढी या नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या, कोणतीही रासायनिक फवारणी नसलेल्या रानभाज्यांना विसरत चाललेली आहे.या रानभाज्यांचे आपल्या निरोगी आरोग्यासाठी फार महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना या रानभाज्यांची ओळख व्हावी, रानभाज्यांपासून चवीष्ठ पदार्थ तयार केले जाऊ शकतात तसेच मुलांना श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व समजावे,यासाठी या रानभाज्या स्पर्धा, प्रदर्शन व विक्री या उपक्रमाचे  आयोजन करण्यात आले.
          या उपक्रमात इयत्ता पाचवी ते नववीचे विद्यार्थी सहभागी झाले. रानभाज्यांपासून उत्कृष्ट पाककृती विद्यार्थ्यांनी  घरून बनवून आणल्या. यात अळूवडी, कुर्डूची वडी, टाकळ्याची,  कुड्याच्या शेंगांची भाजी, अशा विविध पदार्थांचा समावेश होता.
    या स्पर्धेचे परीक्षण प्रशालेतील शिक्षिका सौ जान्हवी पडते सौ पूर्वा नाईक यांनी परीक्षण केले.
      या उपक्रमासाठी दिपीका सायंत यज्ञा साळगावकर श्री रमेश ठाकूर     सौ सिदधी चव्हाण  कलाशिक्षक संदीप साळसकर श्री गुरुनाथ केरकर यांचेसहकार्य लाभले.
     यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापक राजनं हंजनकर पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांनी  विद्यार्थ्यांना रानभाजीचे महत्त्व सांगितले.
     या उपक्रमासाठी .. एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ  पाट पंचक्रोशी च्या सर्व संचालक मंडळ सदस्यानी शुभेच्छा दिल्या.
यामध्ये विघ्नेश सावंत   मयूर चव्हाण आणि संजना रावले यांनी प्राथमिक गटात तर चिन्मयी कोरगावकर श्रावणी परब आणि भूमिका माडकर यांनी माध्यमिक गटात अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले यांचे  अभिनंदन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पंचक्रोशीत या आगळ्यां वेगळ्या उपक्रमाचे कौतूक होत आहे विजेत्यांना पुस्तकं आणि पेन श्री गुरुनाथ केरकर यांच्या तर्फे देण्यात आली

Post a Comment

0 Comments