Type Here to Get Search Results !

भंडारी समाजाच्या महाअधिवेशनाच्या बोधचिन्हाचे कुडाळ येथे अनावरण

भंडारी समाजाच्या महाअधिवेशनाच्या बोधचिन्हाचे कुडाळ येथे अनावरण

  योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

२५ ऑगस्ट २०२४ रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या भंडारी समाजाच्या महाअधिवेशनाच्या बोधचिन्हाचे अनावरण सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष श्री रमण वायंगणकर यांच्या हस्ते कुडाळ येथे पार पडले. 
          भंडारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व भंडारीमंडळाचे एकत्रीकरण करून या अधिवेशनात भंडारी भविष्याचा वेध घेतला जाणार आहे. बोधाचिन्हामध्ये ढाल तलवारीत निळाक्षार अथांग समुद्र त्यात मायनाक भंडारी यांनी ब्रिटिशांचा पराभव करून बांधलेला खांदेरी किल्ला, तोफा असलेली शिडाची युद्धनौका, समुद्र किनाऱ्यावरील कौलारू घर, भातशेती, कल्पवृक्ष नारळ, विद्याभ्यासाचे प्रतीक पुस्तक असा भंडारीसमाजाशी निगडीत इतिहास समाविष्ट करण्यात आला आहे.
              मुंबई, ठाणे,पुणे, नांदेड, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भंडारी प्रतिनिधी येणार असल्याचे रत्नागिरी भंडारी समाजाचे अध्यक्ष श्री राजीव कीर यांनी सांगितले. या अधिवेशनात समाजहिताचे अनेक ठराव संमत केले जाणार आहेत त्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर याचे नाव देण्याची मागणी केली जाणार आहे. या बैठकीला देवगडचे हेमंत करंगुटकर , मुंबईचे उद्योजक श्री आशिष पेडणेकर, कुडाळचे आणासाहेब कांबळी, मालवणचे रविंद्र तळाशीलकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, कणकवलीचे लक्ष्मीकांत मुंडये, समीर जळवी,अतुल बंगे,सागर हडकर , राजेंद्र आंबेरकर, गोविंद सोनसुरकर, अजित गवंडे, विलास करंजेकर, श्री मुणगेकर , रत्नागिरीचे नितीन तळेकर, दिलीप भाटकर, भालचंद्र नागवेकर, राजन बोरकर आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments