ईशा प्रथम व्दितीय मंयक प्राजक्ता तृतीय तर खुल्या गटात महिमा आणि युगा ची बाजी
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
जिल्ह्यास्तरीय संत वेशभूषा स्पर्धा नुकतीच वेंगुर्ला सिद्धिविनायक हाॅल येथे संपन्न झाली महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आषाढी एकादशीच्या निमित्ताने बोलावा विठ्ठल वारकरी संत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन वेंगुर्ले शिवसेना, शाश्वत बहुउद्देशीय संस्था आणि सचिन वालावलकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेत वेंगुर्ला न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची आठवीची विद्यार्थीनी कु. ईशा सुधर्मा गिरप प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक मयंक मोहन नदगडकर आणि तृतीय क्रमांक प्राजक्ता अनिल भोकरे हिने पटकावला तर खुल्या गटातही या विद्यालयाच्या दहावीची विद्यार्थीनी कु.महिमा रूपेश नार्वेकर हिला व्दितीय तर नववी शिकणारी कु.युगा महेंद्र मातोंडकर हि उत्तेजनार्थ पारितोषिकाची मानकरी ठरली.
संताचे विचार त्यांच्या वैचारिक पैलू विद्यार्थ्यांना माहित व्हावे तसेच विद्यार्थ्यांच्या कलात्मक कौशल्याचे प्रकटीकरण व्हावे या साठी ही जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धचे आयोजन करण्यात आल्याची भावना महेंद्र मातोंडकर यांनी व्यक्त केली.
या स्पर्धेत जिल्ह्यांत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची
आठवीची विद्यार्थीनी कुमारी ईशा गिरप हिने संत कान्होपात्राला, द्वितीय क्रमांक साकारणाऱ्या मयंक नदगडकर ज्ञानेश्वर माऊली तर तृतीय क्रमांकाची विजेती प्राजक्ता भोकरे हिने संत जनाबाई साकारली होती तर खुल्या गटातही या विद्यालयाच्या दहावीची विद्यार्थीनी कु.महिमा नार्वेकर ही संत मुक्ताबाईला व्दितीय तर सखुबाईची वेशभूषा युगा मातोंडकर हिने साकारत उत्तेजनार्थ पारितोषिकाची मानकरी ठरली.
या यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले
या यशस्वी विद्यार्थ्यांना दशावतारी स्री कलावंत गिरीघर गांवकर ,सुधीर तांडेल गोट्या येरागी आणि कुर्मदास साकारणारे दाजी मुडये या कलावंतसह या प्रशालेचे लिपिक अजित केरकर तसेच शिक्षक श्री कुबल सर सौ.कुबल मॅडम उपक्रमशील अध्यापक वैभव खानोलकर यांनी आणि यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनी ही विशेष मार्गदर्शन केले
या जिल्ह्यास्तरीय स्पर्धेतील यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूलचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर , संस्था अध्यक्ष विरेंद्र आडारकर कामत, सचिव तथा जेष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले, उपाध्यक्ष रमेश पिगुळकर,निलेश मांजरेकर , राधाकृष्ण मांजरेकर, सुनिल परब तसेच इतर सर्व संस्था पदाधिकारी व सदस्य यांनी यशवंत विद्यार्थी तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे या प्रशालेचे निवृत्त शिक्षक श्री कुबल सर सौ कुबल मॅडम , खानोलकर सर आणि लिपिक श्री अजित केरकर आणि यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांचे आणि या दशावतारी कलावंताचे हि विशेष अभिनंदन केले.
जिल्हा स्तरावर संपन्न झालेल्या वारकरी संत वेशभूषा स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या या विद्यार्थ्यांना न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा प्रशालेचे इतर सर्व शिक्षकांचे ही मार्गदर्शन लाभले तर दिलीप गोठसकर काका यांनी विशेष सहकार्य केले. वेशभूषा स्पर्धेत बाजी मारणाऱ्या या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Post a Comment
0 Comments