वेंगुर्ले रामेश्वर मंदिरातील अखंड भजनी सप्ताहाची काल्याने सांगता
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ला येथील प्रसिद्ध श्री देव रामेश्वराच्या अखंड भजनी सप्ताहाची सांगता आज सोमवारी पालखी प्रदक्षिणा व काल्याने झाली. यावेळी लाडवांचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सोमवार दि.२२ जुलैपासून या अखंड भजनी सप्ताहाला सुरूवात झाली होती. सप्ताह कालावधीत मंदिरात अष्टोप्रहर भजनांबरोबरच निमंत्रितांची संगीत व वारकरी भजने संपन्न झाली. रामेश्वर मंदिरात ‘शंकराचा हंस अवतार‘ तर राम मंदिरात ‘वराह अवतार‘ यावर देखावे साकारण्यात आले. स्थानिक कलाकारांनी उत्कृष्ट रांगोळ्याही साकारल्या. यात शालेय मुलांचा सहभाग विशेषनीय होता. रविवारी रात्री दाभोली नाका ते रामेश्वर मंदिरापर्यंत ‘ज्ञानोबा तुकारामा‘च्या जयघोषात दिडी कार्यक्रम संपन्न झाला. सोमवार सकाळी पालखी प्रदक्षिणेवेळी स्त्री-पुरुषांनी ठिकठिकाणी भजनाचा फेर धरत ‘ज्ञानोबा तुकाराम‘चा घोष केला. पालखी मंदिरात आल्यावर भाविकांनी पालखीवर लाडवांचा वर्षाव केला. लाडवांचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. त्यानंतर गा-हाणे घालून सप्ताहाची सांगता झाली.
फोटोओळी - लाडवांचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.
Post a Comment
0 Comments