Type Here to Get Search Results !

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे विद्यार्थी गुणगौरव संपन्न

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे विद्यार्थी गुणगौरव संपन्न

नवप्रभात NEWS / मालवण 

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी , बारावी परीक्षेतील तसेच शिष्यवृत्ती, एनएमएमएस परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. 
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर,कौन्सील ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सुधीर हेरेकर,जॉईंट सेक्रेटरी चंद्रकांत मयेकर,  मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, प्रा. रुपेश बांदेकर उपस्थित होते.

प्रारंभी एच.बी. तिवले यांनी स्वागत केले. तर आर. डी. बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वामन खोत यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे, त्या क्षेत्रात आपण टॉपर कसे राहू त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, हे प्रयत्न सफल होण्यासाठी मनात जिद्द बाळगली पाहिजे, एकाग्रतेने ज्ञान ग्रहण करून यश संपादन करावे, असे आवाहन केले. तर श्री करलकर यांनी ज्या शाळेने ज्ञानदानाबरोबरच संस्कारक्षम शिक्षण दिले ती शाळा आपली मातृसंस्था आहे या मातृसंस्थेचे ऋण विद्यार्थ्यांनी कधी विसरू नये, जिद्द मेहनत आणि कष्ट करण्याची ताकद यातून विद्यार्थ्यांनी यश संपादन करताना आपल्या शाळेचा, संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी तर आभार प्रदर्शन संदीप संदीप अवसरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments