Type Here to Get Search Results !

वेतोरे सबनीसवाडी येथील खंडीत विजपुरवठ्या बाबत विज ग्राहकांमधून तीव्र संताप


वेतोरे सबनीसवाडी येथील खंडीत विजपुरवठ्या बाबत विज ग्राहकांमधून तीव्र संताप

   योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले तालुक्यातील वरचीवाडी वेतोरे  सबनीसवाडी परिसरातील पाच घरांची खंडित झालेली विजसेवा दोन दिवस उलटूनही अद्याप सुरळीत न झाल्याने ग्राहकांमधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वेतोरे सबनीसवाडी परिसरात शुक्रवार दिनांक १९ रोजी खंडीत झालेली विजसेवा दोन दिवसांनीही सुरळीत न झाल्याने विज वितरण कंपनी प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराचा फटका येथील नागरिकांना बसला असून संबंधित वायरमनावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

रात्रीच्या वेळी गेलेली लाईट सकाळी दहा वाजल्यापासून वीज वितरण कंपनीचे कर्मचाऱी ( वायरमन) तोंडी कळवूनही खंडित विजसेवा सुरळीत केली नसल्याने,येथील नागरिकांनी फोनद्वारे विचारणा केली असता 
आपण दुसऱ्या गावात असुन तुटलेली लाईन दुरुस्ती करत आहोत. थोड्यावेळाने दुरुस्त करतो. आम्ही जेवत आहोत. आम्ही बसून आहोत का.? अशी उत्तरे ग्राहकांना मिळत आहेत . वेतोरे गावात विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू असून कधी तांत्रिक बिघाड तर कधी देखभालीच्या नावाखाली दिवसभरात अनेक तास वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. वाऱ्या पावसामुळे रात्रीच्या वेळेतही विजपुरवठा खंडित होत असल्याने गाव अंधारात बुडून जाते याबाबत वायरमनांशी  संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन न उचलणे, फोन दुसऱ्या ग्राहकांना उचलायला लावणे, फोन स्विच ऑफ करून ठेवणे.असे प्रकार या वायरमनांकडून वारंवार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

वरचीवाडी वेतोरे गावासाठी असलेला वायरमन गावातील विजपुरवठा सुरळीत करण्या ऐवजी दुसऱ्या गावात का जातो..? असा प्रश्न येथील ग्राहकांना पडला आहे.या अशा कामचुकार वायरमनावर विज वितरण कंपनीकडून कारवाई करण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.बिलाच्या वसुलीसाठी विजपुरवठा तोडण्याचा इशारा देणाऱ्या महावितरण मंडळाची सुरळीतपणे विजपुरवठा करण्याची जबाबदारी नाही का,असा सवालही संतप्त वीज ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

Post a Comment

0 Comments