गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ निवृत्त शिक्षिका मोहिनी पेडणेकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुका स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्याला ज्ञानदानाचे कार्य केलेल्या शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत गुरुपौर्णिमा साजरी केली. तर ज्येष्ठ निवृत्त शिक्षिका मोहिनी पेडणेकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
गुरुपौर्णिमेदिवशी प्रत्येकजण आपल्या गुरूंची आठवण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. वेंगुर्ला तालुकास्कूलच्या निखिल घोटगे, उन्मेश वेंगुर्लेकर, राहूल मोर्डेकर, जितेंद्र सामंत, चेतन ठोंबरे, भैय्या गुरव, सोहम भगत व सुशेन बोवलेकर या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शालेय जीवनात शिक्षक म्हणून लाभलेल्या शिक्षकांच्या घरी जात त्यांना गुरूपौर्णिच्या शुभेच्छा देत त्यांचे आशीर्वाद घेतले. यात मेघा पाटकर, मोहिनी पेडणेकर, वि.म.पेडणेकर, राजेंद्र बेहरे, आनंद पेडणेकर, सुहासिनी अंधारी या शिक्षकांचा समावेश होता. यावेळी शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
Post a Comment
0 Comments