Type Here to Get Search Results !

मराठा समाजाच्या मुलानी पुढील सूचना येईपर्यंत नॉन क्रिमिलेअर दाखल्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात जुने SEBC चे जात प्रमाणपत्र जोडावे

मराठा समाजाच्या मुलानी पुढील सूचना येईपर्यंत नॉन क्रिमिलेअर दाखल्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात जुने SEBC चे जात प्रमाणपत्र जोडावे


   योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 


कुडाळ तालुक्यातील मराठा समाजाच्या मुलांना जातीचा दाखला काढताना अनेक अडचणी येत होत्या.मुळात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सरकारकडून अद्याप पर्यंत प्रशासनाला कोणतेही सूचना नसल्याने नवीन मराठा आरक्षण(१०%) कायद्याप्रमाणे जातीचे दाखलेच दिले जात नाही आहेत.आणि पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ३१ मार्च आहे.तोपर्यंत जर का दाखले मिळाले नाही तर आरक्षणाचा लाभ नोकरीसाठी इच्छूक मराठा युवकांना कसा घेता येणार.त्यामुळे नवीन दिलेल्या आरक्षणाचा प्रश्न हा सरकारकडून अधांतरीच ठेवण्यात आलेला असून सरकारला मराठा मुलांच्या भविष्याची काहीही पर्वा नसल्याचे दिसून येत आहे.म्हणून मराठा मुलांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क केले असता. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत यांनी त्वरित कुडाळ प्रांताधिकारी  यांची भेट घेतली व याकडे त्यांचे लक्ष वेधले. 

यावेळी प्रांताधिकारी कुडाळ यांनी  यापुढे कोणतीही तक्रार येणार नाही असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित सर्व मराठा युवकांनी ऍड. सुहास सावंत यांचे आभार मानले.

मुळात पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ३१ मार्च आहे.तोपर्यंत जर का दाखले मिळाले नाही तर आरक्षणाचा लाभ नोकरीसाठी इच्छूक मराठा युवकांना कसा घेता येणार.त्यामुळे मोठा गाजा बाजा करून नवीन दिलेल्या आरक्षणाचा प्रश्न हा सरकारकडून अधांतरीच ठेवण्यात आलेला असून सरकारला मराठा मुलांच्या भविष्याची काहीही पर्वा नसल्याचे दिसून येते अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

भरतीला उतरणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसहित जातीच्या आणि नॉन क्रिमिलेअर दाखल्यासाठी  त्वरित अर्ज करावेत,पुढील सूचना येईपर्यंत नॉन क्रिमिलेअर दाखल्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात जुने SEBC चे जात प्रमाणपत्र जोडावे असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघामार्फत करण्यात आले आहे.काही अडचण असल्यास जिल्हा कार्यालयाशी यांच्याशी संपर्क करावा-9112091326




        🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी, देवगड ,बांदा ,दोडामार्ग, तरळे ,मालवण ,फोंडा ,ओरोस, सातार्डा ,शिरोडा ,आरोंदा, कुडाळ, माणगाव, कणकवली , आंबोली, सावंतवाडी प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments