Type Here to Get Search Results !

हुमरमळा येथील बीएसएनएलच्या टॉवरमध्ये बिघाड झाल्याने ग्राहक झाले हैराण

हुमरमळा येथील बीएसएनएलच्या टॉवरमध्ये बिघाड झाल्याने ग्राहक झाले हैराण

   मनोज देसाई
नवप्रभात NEWS 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हुमरमळा येथील बी.एस.एन.एल.च्या टॉवर मध्ये बिघाड झाल्याने येथील मोबाईल धारक हैराण झाले आहेत.
हुमरमळा येथे असलेल्या बीएसएनएलच्या टॉवर वरून येथील ग्राहकांना सेवा मिळते मात्र, रविवार सकाळ पासूनच, टॉवर यंत्रणेमध्ये बिघाड झाला.तो थेट सोमवार (१८ मार्च) पर्यंत सुरूच होता. त्यामुळे, त्याचा परिणाम येथील मोबाईल धारक, व्यापारी,आदींवर झाला.  
या सेवेत सुरळीत पणा यावा अशी मागणी मोबाईल धारकांतुन होत आहे. इतर वेळेस ही सदर टॉवर यंत्रणेमधुन , ग्राहकांना इंटरनेटवर सेवेतही दर्जेदार पणाचा अभाव असतो.तालुका पातळीवरील यंत्रणेतून ४जी (4G) सेवा मिळते मात्र, हुमरमळा येथील या ग्रामीण भागातील प्रक्षेपण टॉवर यंत्रणेमधुन, याचा अभाव आढळतो. येथेही फोरजी सेवा मिळावी अशी, मागणी मोबाईल धारकातून होत आहे.!



       🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922



Post a Comment

0 Comments