Type Here to Get Search Results !

हुमरमळा येथील रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मोठ्या गटात समर्थ गवंडी तर लहान गटात वैष्णवी मुणनकर ठरली विजेती

हुमरमळा येथील रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मोठ्या गटात समर्थ गवंडी तर लहान गटात वैष्णवी मुणनकर ठरली विजेती

मनोज देसाई/कुडाळ
 नवप्रभात NEWS 

हुमरमळा रामेश्वर मंदिरातील महोत्सवानिमित्त आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेत, मोठ्या गटात समर्थ गवंडी याने प्रथम,तर लहान गटात वैष्णवी मुणनकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.तर मोठ्या गटात नेहा जाधव, प्रयेश पवार यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.लहान गटात निधी खडपकर,(द्वितीय)व आरव आईर(तृतीय) क्रमांक मिळविला.
हुमरमळा रामेश्वर मंदिर येथील हौशी मित्र मंडळाने कै.राजन देसाई स्मरणार्थ सदर खुल्या जिल्हा स्तरावरील नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला जिल्ह्यातुन ऊत्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी पंकज राजन देसाई, वैभव देसाई, विवेक देसाई,मयांक देसाई,यश मांजरेकर, मोतीराम मांजरेकर,अनुज मांजरेकर, आदींनी बक्षिसे,तर योगेश संतोष गाळवणकर , मिलिंद सुहास पारकर, यांनी सन्मान चिन्हे इ. पुरस्कृत केली. बक्षिसं वितरण श्रीमती रूपाली राजन देसाई, सौ.मयुरी देसाई,सौ.ऊषा ऊल्हास देसाई,सौ.सोनाली देसाई, सोनाली मांजरेकर,वैभव मांजरेकर, मिलिंद सुहास पारकर,आदींच्या हस्ते करण्यात आले. सुत्रसंचलन स्नेहल सामंत यांनी केले.तर परिक्षण कु.निकीता प्रभु(पणजी) व डॉ.योगेश प्रभु यांनी केले.



           🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments