योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले कुबलवाडा,भराडी मंदिर शेजारी आंब्यांच्या झाडावर औषध फवारणी करताना झाडाची फांदी तुटून कामगार खाली पडून मयत झाला आहे. शेखर महादेव नाईक, वय ४९ राहणार वेंगुर्ले परबवाडा कणकेवाडी असे त्या कामगाराचे नाव आहे. ही दुर्घटना आज शनिवार २ मार्च रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
कुबलवाडा येथे प्रविण कुबल यांच्या आंबाबागेत नाईक काम करीत होता. कुबल यांनी पोलिसांना दिलेल्या माहिती मध्ये म्हटले आहे की, आंब्याच्या बागेत इतर कामगारांसोबत शेखर नाईक हा मागील सुमारे ८ ते १० वर्षापासून आमच्या कडे कामास आहे. आज सकाळी ९ वाजल्या पासून निलेश कोनार व शेखर नाईक बागेत आंब्यांच्या झाडांवर औषध फवारणीचे काम करीत होते. दुपारी ११.३० वा. च्या दरम्याने आम्ही सर्व नाष्टा करुन आलो. त्यानंतर बागेतील आंब्याच्या झाडावर फवारणी करण्याकरीता शेखर नाईक आंब्याच्या झाडावर राजु बांधुन चढ़त असताना आंब्याच्या झाडाची फांदी तुटल्याने तो झाडावरुन उताण्या स्थितीत जमीनीवर पडून बेधुध्द पडला. तत्काळ त्याला उचलून वनकुद्रे यांच्या दवाखान्यात दाखल केले व पुढील उपचाराकरीत वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र वैदयकिय अधिकारी यांनी त्याला तपासले असता मयत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments