Type Here to Get Search Results !

इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावा मनसेतर्फे वेंगुर्ला मुख्याधिकारी यांना निवेदन

वेंगुर्ल्यात मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेतर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

   योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

 सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व आस्थापनांवर मराठी पाट्या सक्तीच्या असूनही वेंगुर्ल्यात ब-याच आस्थापनांवर व दुकानांवर इंग्रजी पाट्या सर्रास दिसत आहेत. येत्या आठ दिवसांच्या आत इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन मनसे वेंगुर्ला तर्फे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदन प्रसंगी तालुका अध्यक्ष सनी बागकर, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, तालुका उपाध्यक्ष महादेव तांडेल, शहर अध्यक्ष सुरज मालवणकर यांच्यासह स्नेहा कुडाळकर, सहदेव फोडनाईक, संतोष परब, प्रथमेश नाईक, प्रशांत कुडाळकर, प्रफुल्ल धुरी, विक्रम मोरजकर, प्रतिक गोरे, गौरव मराठे, तेजस वेंगुर्लेकर, लक्ष्मण दळवी आदी पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते. दरम्यान, शहरातील इंग्रजी पाट्या बदलण्यासाठी ध्वनीक्षेपकाद्वारे कार्यवाही केली जात आहे. 


     🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments