Type Here to Get Search Results !

वेंगुर्ल्यात राहणाऱ्या परप्रांतीयांची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी

वेंगुर्ल्यात राहणाऱ्या परप्रांतीयांची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी
पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे आवाहन

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

सर्व आंबा-काजू बागायतदार, रस्ते व बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, घर भाड्याने देणारे इसम आदींनी आपल्याकडे कामासाठी आलेल्या व घर भाड्याने घेवून रहात असलेल्या सर्व परप्रांतीय तसेच नेपाळी नागरिकांबाबतची माहिती त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांसह पोलीस ठाणे येथे नोंद करावी, असे आवाहन वेंगुर्ले पोलीस स्टेशनतर्फे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी केले आहे.

आपल्याकडे विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक व नेपाळमधून कामगार येत आहेत. - हे कामगार थोडे दिवस काम करुन परत आपल्या गावी निघून जातात. त्यातील काही इसम आपल्या मूळ गावी गुन्हयाचे कृत्य करून ते येतात. यातील काही कामगार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हेगारी कृत्य करून पलायन करतात. सदर कामगारांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने त्यांचा शोध घेणे कठीण होवून जाते. तर दुसरीकडे पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठीही मोठया प्रमाणात परदेशी नागरिक येऊन ते हॉटेल, लॉजे अथवा घर भाड्याने घेऊन मुक्काम करतात. अशा परदेशी नागरिकांचे सी फॉर्म भरून त्यांची माहिती पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक आहे.

दरम्यान, परकीय नागरिक पर्यटक, परप्रांतीय कामगार, नेपाळी याबाबतची माहिती पोलीस ठाणे येथे देण्यास टाळाटाळ केली तर अशा व्यक्तींविरूद्ध प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments