Type Here to Get Search Results !

केळुस ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार जाहीर

केळुस ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार जाहीर

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत सन २०२२-२३ करिता वेंगुर्ले तालुक्यातील केळुस ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. तालुक्यात सर्वाधिक ८६ गुण मिळविलेल्या या ग्रामपंचायतीला १० लाखाचे बक्षीस मिळणार आहे.

स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्वर, अपारंपरिक उर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञान या पाच स्मार्ट निकषांवर ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपक्रमांच्या आधारे करण्यात आलेल्या मूल्यमापनात ग्रा.पं.ला ८६ गुण प्राप्त झाले. या ५ निकषांवर वैयक्तिक शौचालय व वापर, सार्वजनिक इमारतीमधील शौचालय सुविधा व वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य व शिक्षणविषयक सुविधा, केंद्र व राज्य पुरस्कृत योजनाची प्रभावी अंमलबजावणी, बचतगटांचे काम,

प्लास्टिक वापर बंदी, ग्रामपंचायत घरपट्टी व पाणीपट्टी वसुली, पथदिवे एलईडी करणे, वीजबिल पाणी बिल भरणा, मागासवर्गीय खर्च, महिला बाल कल्याण खर्च, लेखापरीक्षण पूर्तता, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण पारदर्शकता व तंत्रज्ञान, ग्रामसभेचे आयोजन, सामाजिक दायित्व, सौर पथदिवे, बायो गॅस वापर, वृक्ष लागवड, जलसंधारण, अभिलेख्यांचे सर्व वर्गीकरण, संगणकीकरण ग्रामपंचायत संकेत स्थळ वापर, आधार कार्ड १०० टक्के, संगणक व अज्ञावलीचा वापर आदी घटकांची सर्व कामे करून ग्रामपंचायत केळूसला स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झाला, असे सरपंच योगेश शेट्ये व ग्रामपंचायत अधिकारी विवेक वजराटकर व उपसरपंच संजीव प्रभू यांनी सांगितले. यासाठी गावातील ग्रामस्थ, सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, बचत गट यांच्या सहकार्यामुळे केळूस ग्रामपंचायत स्मार्ट ग्राम होऊ शकली, असे सरपंच योगेश शेट्ये यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments